देव पाहायचा असेल तर आई मध्ये पहा  - राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य

 



देव पाहायचा असेल तर आई मध्ये पहा  - राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य

 




 

उदगीर : देवाचे दिव्यत्व, देवाचे पूजत्व देवाची दया पहायची असेल तर आई मध्ये पाहिले पाहिजे असे मत विचार राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी व्यक्त केले

राष्ट्रसंत डाॅ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचा 104 वा जन्मोत्सव (तिथीनुसार) दि. 26 फेब्रुवारी रोजी येथील परमेश्वरी मंगल कार्यालयात महारुद्राभिषेक व जन्मोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला .

या कार्यक्रमास श्री गुरू हावगीस्वामी मठाचे मठाधीश डाॅ. शंभूलिंग शिवाचार्य महाराज, शिवाचार्य महाराज मेहकर, डॉ.शिवाचार्य महाराज मांजरसुंबा, शंकरलिंग शिवाचार्य महाराज हाणेगाव, बसवलिंग शिवाचार्य महाराज कवळास, सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, शंकर लिंग शिवाचार्य महाराज शिरूर अनंतपाळ आदी शिवाचार्य उपस्थित होते.

जन्मोत्सवानिमित्त सौ.उमादेवी अशोक स्वामी माळेवाडीकर परिवाराच्या वतीने सकाळी 11 वाजता महारुद्राभिषेक संपन्न झाला.

यावेळी राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी भक्तांच्या आरोग्यासाठी धन्वंतरी अवतार रूप धारण केले होते. जन्मोत्सव कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रसंत डॉ.शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून करण्यात आले.

सौ.उमादेवी अशोक स्वामी माळेवाडीकर परिवाराच्या वतीने डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांचा 104 व्या जन्मोत्सवानिमित्त फेटा बांधून व सन्मानचिन्ह देऊन स्वागत केले तर उपस्थित शिवाचार्य मंडळींचे स्वागत स्वामी परिवाराच्या वतीने करण्यात आले.

यावेळी आपल्या आशीर्वचन राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज म्हणाले की मातृदेवच आनंदाचा क्षण देऊ शकते, देव दैत्याने सागराचे मंथन करून 14 रत्न काढले त्यामुळे चौदार चौकटीचे राज्य असले तरी मातृदेवा शिवाय जिवन पूर्ण होऊ शकत नाही सांगून देव कुणी पाहिला का? देवाचे दिव्यत्व पहायचे असेल, देवा पूज्यत्व पहायचे असेल, देवाची दया पहायची असेल तर ते आई मध्येच पहिली पाहिजे. बाळाच्या वाढदिवसाची कल्पना फक्त आईलाच होते. परंपरा या अधिक उत्साहाने पूर्ण केल्या पाहिजेत भारतीय संस्कृती ही प्राचीन संस्कृती आहे मानवी विकासाची धारणा निघाली मात्र त्या अगोदर मातृसत्ता होती कालानुरूप परिवार पद्धती बदलली भारतीय संस्कृती परंपरा सर्वश्रेष्ठ आहेत. त्या परंपरा जपल्या पाहिजेत माणूस किती दिवस जगला यापेक्षा कशाकरता जगला व काय केले त्याला अधिक महत्त्व आहे असे सांगून 104 वा वाढदिवस साजरा करत असला तरी मी चार वर्षाचा बाळ आहे मी चौथ्या वर्षात प्रवेश केला असून जन्माचा चौथा वाढदिवस साजरा करत आहात माझा जन्म समाजाच्या उद्धाराकरिता समर्पित आहे असे भावपूर्ण विचार व्यक्त केले.

महाआरतीने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रमाचे संचालन व आभार रतिकांत स्वामी यांनी केले महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्तिक स्वामी, बाबुराव स्वामी, संजय दस्तुरे यांच्यासह भक्ताने परिश्रम घेतले.




Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
राज्यमंत्री संजय बनसोडे यांची इच्छापूर्ती कोचिंग क्लासेसला सदिच्छा भेट
Image
देवणी तालुक्यात गल्लोगल्ली मिळु लागलीय स्वस्तातील बनावट दारू...प्रशासनाचे दुर्लक्ष ...कार्यवाही होणार का ?
जिल्हयातील NEET (UG) परिक्षा - 2020 च्या परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी
Image
दिव्यांगाचे राखीव निधी तत्काळ द्या अन्यथा न्यायासाठी आंदोलन करु - निळकंठ डोंगरे
Image