अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी

अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या : जि.प.अध्यक्ष राहुल केंद्रे यांची मागणी 



   उदगीर : अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्ण मोडले असून आता कालच्या पावसाने होते नव्हते ते सर्व संपविले आहे,या अस्मानी संकटात शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी मागणी लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी केली आहे.


  यावर्षी खरीप हंगामाची सुरुवात कोवीड काळात झाली. संपूर्ण जग ठप्प असताना या काळातही गप्प न राहता शेतकऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून कोवीडकाळाताही मशागतीची कामे करून काळ्या आईची ओटी भरली. खत बियाणे मिळविण्यासाठी टाळेबंदीच्या शेतकऱ्यांना जोखीम घेऊन खतेबियाण्यांची जुळवाजुळव करीत पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना बोगस बियाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागले. दुबार पेरणीच्या खर्चाने शेतकरी घाईकुतीला येऊनही बोगस बियाण्यांच्या संदर्भाने कोणतीही कार्यवाही शासनाने केली नाही.


यानंतर अधिकच्या पावसाने उडीद आणि मुगाचे पूर्ण नुकसान केल्याने ही पिकेही शेतकऱ्यांच्या हाती लागली नाहीत.


    मागच्या पंधरवाड्यापूर्वी झालेल्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाती येणाऱ्या सोयाबीनला ऐन भरात धोका दिला. याशिवाय तुर, ज्वारी या पिकांचे तर नुकसान केलेच पण उसाचे पिकही आडवे पाडले. उरलेसुरले सोयाबीनचे पीक काढणीची प्रक्रिया चालू असताना मंगळवारी झालेल्या पावसाने सा-या सोयाबीनची माती केली आहे.सोयाबीन काढणीसाठी लागणारी मजुरी व ताडपत्रीचे सुद्धा पैसे निघण्याची आता खात्री उरलेली नसल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे पूर्ण मोडले आहे.


   या नैसर्गिक आपत्तीने उध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता शासनाने मदतीचा हात देण्याची गरज असून कोणतेही निकष अथवा पंचनामे आदी घोळ न घालता शासनाने शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी अशी आग्रही मागणी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल केंद्रे यांनी शासनाकडे केली आहे.


 


 


Popular posts
डॉक्टर, नर्सेस यांना सेवा मानधन तत्वावर घेण्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांचे निर्देश
उदगीर येथे आणखी एक कोरोना पाॅझिटिव्ह....  एकुण रुग्णांची संख्या २२
Image
शहरात काॅरनटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात यावेत - राज्यमंत्री संजय बनसोडे
Image
उदगीरच्या आणखी एकाचा कोरोना अहवाल पाॅझिटिव्ह...एकुण रुग्णांची संख्या १४ वर
Image
शिवाजी महाविद्यालयात दोन दिवसीय ऑनलाइन आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन